काँग्रेसचे वाई तालुका अध्यक्ष रविंद्रआप्पा भिलारे
वाई / प्रतिनिधी
आधीच सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडलेले आहे. प्रचंड महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांमध्ये सोसायट्यांची वाढीव मुदत 31 जुलेला संपत आहे. सोसायट्याची देणी भागल्याशिवाय लोकांना उलाढाली करता येत नाहीत. त्यामूळे ऊस बिले तातडीने अदा करुन शेतकरी बांधवांना या दुष्टचक्रातून मुक्त करावे अन्यथा काँग्रेस पक्षाचे वतीने तीव्रआंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसचे वाई तालुका अध्यक्ष रवींद्र अप्पा भिलारे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज शेतकरी आपल्या हक्काच्या पैशासाठी कारखान्यावर हेलपाटे मारत आहे. त्यांना 1000 प्रमाणे पैसे देवुन त्यांची बोळवण केली जात आहे. एकरकमी पैसे मिळाले तर लोकांना कामी येतो त्यात सोसायट्यांनी दिलेली मुदतवाढ 31 जुलेला संपत आहे. तरी तातडीने एकरकमी उस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. कारखाना बंद होऊन सहा महिने उलटून गेले आहेत विरोधक तोंडाला कुलुप लावुन आहेत. परंतू काँग्रेस पक्ष बघ्याची भुमिका घेणार नाही.
कामगार लोकांचे पगार मिळाले नाहीत. त्यांची कुटुंब अडचणीत आली आहेत. त्यांचे पगार वेळेत झालेच पहिजेत. कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे, घामाचे दाम त्यांना मिळालेच पाहिजे. कारखाना व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे. त्याची झळ विनाकारण शेतकरी आणि कामगारांना सोसावी लागत आहे. शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यांवर उतरुन विरोध करायलाही कचरणार नाही.
वेळोवेळी विरोधकांनी आवाज उठवला असता तर किसनवीर कारखान्याची ईतकी बिकट अवस्था झाली नसती. विरोधकांनी(आमदार गटाने) सभासदांना वाऱ्यावर सोडले आहे. परंतू काँग्रेस पक्ष यामधे लक्ष घालुन सभासद शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे, याची ग्वाही देतो, असे त्यांनी शेवटी पत्रकात सांगितले आहे.