प्रतिनिधी/सातारा
येथील लक्ष्मी टेकडी परिसरात पाच दिवसांपूर्वी बापू कारंडे हे क्वारंटाईन झाले होते. घर बंद असलेला याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कारंडे यांचे बंद घर फोडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिसात झाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदर बाजार येथील बापू कारंडे हे मोलमजुरी करतात. ते गेल्या पाच दिवसापासून क्वारंटाईन झाले आहेत. त्यांचे बंद घराचे दार चोरट्याने फोडून घरातल्या कपाटात ठेवलेले रोख 15 हजार रुपये, साडे चार तोळ्यांचे गठन, अर्ध्या तोळ्यांची सोन्याची साखळी असा ऐवज चोरून नेला. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास करत आहेत.
Previous Articleसंंरक्षण मंंत्रालयाकडून 101 संरक्षण सामग्रींवर आयात बंदी
Next Article ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांवर








