वार्ताहर / कास
जागतीक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारवरील नैसर्गीक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असुन कोरोनाचे नियम पाळत ऑनलाईन बुंकींगने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय वनसमीतीच्या बैठकीत घेण्यात आला हंगाम पर्यटकांना खुला करण्याच्या हलाचालींना वेग आला असुन हंगामाच्या नियोजनाची बैठक बुधवारी पार पडली आहे.
कोरोनाच्या प्रर्द्रुभावामुळे गेल्यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता मात्र नुकतेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठारच्या सयुंक्त कार्यकारी वनसमीतीने बुधवारी बैठक आयोजीत करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्ट दरम्यान खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे नियम पाळून ऑनलाईन बुकींगनेच पठारवर प्रवेश दिला जाणार असुन प्रति माणशी १०० रुपये प्रवेश शुल्क आकरण्यात येणार असुन वाहन पार्कीग गाईड बस प्रवास सह अन्य शुल्कही दयावे लागणार आहेत.
बैठकीत कार्यकारी वनसमीतीच्या नवीन अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या असुन अध्यक्षपदी कुसुंबी गावचे मारूती चिकणे व उपध्याक्ष पदी कास गावचे दत्ता किर्दत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक सातारा सुधीर सोनवले जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसीह परदेशी सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व सहागावचे वनसमीतीचे पदाधिकारी उपस्थीत होते.