प्रतिनिधी/कास
सध्या जिल्ह्यात कमाल तापमान 39° वर पोहचला असून पाण्याची ठिकाणे सुकू लागली आहेत. याचा परिणाम जंगली प्राण्यांवर होत असून जंगलातील नैसर्गिक पाणवठे, झरे तळी सुकल्याने त्यांना पाण्याचा शोधत फिरावे लागते आहे. काल साताऱ्यापासून जवळच असलेल्या कास धरणावर जंगली गव्यांचे पाणी पिताना दर्शन झाले.
कास धरणाचा भिंती खाली असलेल्या रस्त्यावरील पुला खाली गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आले होते. या ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. अश्या या जंगली प्राण्यांसाठी वन विभागामार्फत ठिकठिकाणी पाण्याची कृत्रिम तळी निमार्ण करण्यात यावीत. जेणे करून प्राण्यांना आपले जीव धोक्यात घालून रस्त्यावर अथवा लोक वस्तीत यावे लागू नये, त्यामुळे होणारे अपघात ही टळतील अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.
Previous Articleउत्तराखंडात 1,109 नवे कोरोना रुग्ण; तर 88 जणांना डिस्चार्ज!
Next Article लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढविली









