सातारा / प्रतिनिधी :
नवीन वर्षाच्या दिवशी मौजमजा कास पुष्प पठारावर जाणाऱ्यांना ब्रेक लावण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी ठिकठिकाणी चेक नाके तयार केले आहेत. यवतेश्वर घाटात कासकडे जाणारी वाहने पोलीस तपासत होती. त्यामुळे कास पुष्प पठाराकडे जाणारे पर्यटकही काळजी घेताना दिसत होते.
जुने वर्ष सरले आणि नवीन वर्ष सुरू झाले. या नवीन वर्षाच्या स्वागताला काही मंडळी धागडधिंगा करतात. अशी काही मंडळी कास पुष्प पठारावर बिनधास्तपणे पार्टी करुन नवीन वर्ष साजरे करतात. अनुचित प्रकारही घडतात. त्यामुळे अशा प्रकारांना ब्रेक लावण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सुचनेनुसार सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर घाटात चेकनाके तयार केले होते. ठिकठिकाणी पर्यटकांची तपासणी केली जात होती.









