115 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 8 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
सातारा/प्रतिनिधी
सातारा जिल्हा कारागृहातील निकट सहवासित 26 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
115 जणांचा अहवाल निगेटिव्ह
तसेच वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 99, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
8 जण विलगीकरण कक्षात दाखल
काल दि. 14 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 78, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 45, तर कोरोना बाधित दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleकर्नाटकातील नागरिकांची गावी जाण्यासाठी रिघ चालूच
Next Article पाणी दरवाढीला अखेर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती








