सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी व पदाधिकारी निवडीला राज्याचे प्रांताध्यक्ष बाळसाहेब थोरात यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सहा जिल्हाउपाध्यक्ष, एक खजिनदार, बारा सरचिटणीस, नऊ चिटणीस, एकवीस सदस्य, नऊ कार्यकारिणी सदस्य आणि सहा कायम निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली.
नव्याने काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत उपाध्यक्ष म्हणून वडगाव हवेलीचे जयवंतराव जगताप, सातारारोडचे अविनाश फाळके, हिंगणगावचे पोपटराव काकडे, बिजवडीचे एम.के.भोसले, आसवलीचे चंद्रकांत ढमाळ, नडशीचे निवासराव थोरात, खजिनदारपदी आरळय़ाचे बाबासाहेब कदम, सरचिटणीसपदी मंगला गलांडे, नानासाहेब पाटील, मनोहर बर्गे, वंदना धायगुडे, संजीव साळुंखे, दत्तात्रय धनावडे, नरेश देसाई, शंकर लोखंडे, सलिम बागवान, विष्णू अवघडे, विश्वंभर बाबर, विलास पिसाळ, चिटणीसपदी राजेंद्र चव्हाण, अविनाश नलवडे, नजिम इनामदार, राजेंद्र डोईफोडे, भरत जाधव, राहुल चव्हाण, विकास गोंजारी, अतुल सपकाळ, अमर करंजे.
तर सदस्यपदी मारुती जाधव, नंदकुमार जगदाळे, दुर्गेश मोहिते, नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव, विद्या थोरवडे, अशोक पाटील, प्रदीप जाधव, विशाल चव्हाण, आनंदराव जाधव, राजेंद्र कदम, राजेंद्र घाडगे, शिवाजीराव गायकवाड, शिवाजीराव खामकर, अभिजीत पाटील, शरद गोळै, विजय बनसोडे, शिवाजीराव महानवर, शिवाजी जगताप, मंजिरी पाणसे, संदीप चव्हाण, तर कार्यकारीणी सदस्य म्हणून विराज शिंदे, प्रताप देशमुख, धनश्री महाडिक, मनोज तपासे, बाळासाहेब शिरसाट, शिवराज मोरे, झाकीर पठाण, डॉ. विलास थोरात, अमित जाधव यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे.









