मागण्या मान्य न केल्यास 4 ऑक्टोबरला विधान भवनावर आक्रोश मोर्चाचा इशारा
पोलिसांनी घेतले आंदोलनकर्त्यांना ताब्यात , घोषणांनी परिसर गेला दणाणून
प्रतिनिधी / सातारा
कलाकारांच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर कलाकार महासंघाने आपल्या विविध मागण्यांसाठी वाजतगाजत मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचताच त्यांनी बोंब ठोकली.पोलिसांनी आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले. हे आंदोलन कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांच्या नेतृत्वखाली काढण्यात आला होता. कलाकार महासंघाचा मोर्चा पोवई नाका येथून सुरुवात करण्यात आला. घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचला. पोलिसांनी प्रवेशद्वारावरच आंदोलकांना अडवले. तत्पूर्वी शासनाच्या नावाने बोंब ठोकली. त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना अनिल मोरे म्हणाले, 22 तारखेला महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोकांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन ची घोषणा केली. महाराष्ट्रमध्ये सगळ्या क्षेत्रातील कलाकार गेली सहा महिने घरात बसून आहेत. सरकारला आम्ही विनंती केली आहे. पालकमंत्री, सांस्कृतिक मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी यांना भेटून यावर तोडगा काढा अशी विनंती केली. मालक व कलाकार लोकांचं झालेलं नुकसान आहे. त्यासाठी वेगळं पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली आहे. सरकारने या सगळ्याकडे दुर्लक्ष केले आहे. परवा महामार्ग रोखला. सगळ्या क्षेत्रातील कलाकार रस्त्यावर आलो तरीसुद्धा सरकारने दखल घेतली नाही म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, 30 तारखे पर्यन्तची मुदत दिली आहे. मागण्या मान्य केल्या नाहीत तर 4 ऑक्टोबर रोजी विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.
मास्कवरून पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात शाब्दिक
कोरोनाचे नियम पाळले नाहीत हे पाहून आंदोलनकर्त्याना पोलिसांनी विनंती केली की मास्क तरी घाला. त्यावरून एका कार्यकर्त्यांला भलताच राग आला. नाही घालणार मास्क, ज्याला भीती वाटते त्याने माझ्या जवळ येऊ नये असे बोलून दाखवू लागला. त्याच्यापुढे सातारा पोलीस हतबल झाले.









