रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत खा. उदयनराजेंनी केली रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत व मागण्यांबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱ्यात आणण्याबाबतचे निवेदन देखील यावेळी खा. उदयनराजेंनी रेल्वेमंत्री गोयल यांना दिले. तसेच मागण्या- प्रशासकिय मंजूरी मिळालेला सुमारे ३००० कोटी रूपये खर्चाच्या कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी देखील केली.
त्याचबरोबर रेल्वेच्या विविध प्रश्नावर श्री गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी गोयल यांनी साताऱ्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यात, पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले सातारा रेल्वे स्टेशनचे नुतणीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करावे. जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटनासाठी पर्यटक आकर्षित होतील. सातारा जिल्ह्यातील महागाव येथे रेल्वे खात्याची ५० एकर मोकळी जमीन उपलब्ध असून या जमीनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरउर्जा प्रकल्प उभा करावा. जेणेकरून निर्माण झालेली वीज रेल्वेच्याच वापरात येईल. या महत्वाच्या मागण्याचे निवेदन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









