कराड / प्रतिनिधी
जखिणवाडी ता. कराड येथे कारला अनोळखी भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना गुरूवारी पहाटे तीन वाजता घडली. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले असून अन्य तीन प्रवासी जखमी झाले.
श्रीहरी वाघमारे (वय 48, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब कांबळे (वय 50, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अश्विनी वाघमारे (वय 45), रागिनी वाघमारे (वय 21, रा. रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद चतुर (वय 39, रा. गंगानगर फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी फुलचंद चतुर यांनी फिर्याद दिली आहे. हे सर्व हडपसर येथून बेळगाव जिल्ह्यातील नागमुनेळी येथे औषध आणणेसाठी निघाले होते. कराडपासून काही अंतरावर जखिणवाडी फाटा येथे मळाईदेवी पतसंस्था समोरील चौकात कारला अनोळखी वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारसाठी खाजगी हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. तर अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे व चालक फुलचंद चतुर हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळावरून धडक दिलेल्या चालकाने वाहनासह पलायन केले.









