सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील रत्नदीप पोपट सोनावणे (वय 26) हा दि.1 रोजी दुपारपासून बेपत्ता आहे. त्याची उंची पाच फुट 6 इंच, बांधा मध्यम, चेहरा उभट, रंग निमगोरा, अंगात गुलाबी टीशर्ट व जीन्स पॅन्ट असून, हरवल्याची खबर त्याच्या कुटुंबियांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. भुईंज पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









