प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील एमआयडीसीतील धनगरवाडीतील मातंगवस्तीत असणाऱ्या दारुच्या दुकानावर चोरट्य़ांनी दि. 9 ते दि. 10 च्या दरम्यान डल्ला मारुन दारुच्या दुकानातील रोकड व साहित्य असा सुमारे 27 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अविनाश नंदकुमार माने याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे एमआयडीसीतील धनगरवाडी येथील मातंगवस्तीत एस.एस.माने नावाचे देशी दारुचे दुकान आहे. या दारुच्या दुकानाचे अज्ञात चोरटय़ाने दि. 9 ते दि. 10 च्या दरम्यान, छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील साहित्य व 27 हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला आहे. महिला पोलीस नाईक सुतार या तपास करत आहेत.









