सातारा / प्रतिनिधी
सर्कल संघटनेने पोस्टमेंन व एम.टी.एस केडरच्या ओपन मार्केट कोट्यातील रिक्त जागा त्वरित भरा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकरीता पोस्टल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यानिमित्ताने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
पोस्टमेंन व एम.टी. एस व महाराष्ट्र व गोवा सर्कल यांच्यावतीने काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवण्यात आला. सर्कल संघटनेने पोस्टमेंन व एम.टी.एस कॅडर च्या ओपन मार्केट कोट्यातील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या करीता सर्कल प्रशासनाला दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या आंदोलनाच्या नोटीस प्रमाणे पहिला टप्पा म्हणजे कामाच्या वेळेत काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदविण्यात आला. दिल्ली सर्कल प्रमाणे वितरण विभागात सम व विषम पध्दतीने कामाचा फॉर्म्युला ठरवावा वा त्वरित रोस्टर ड्युटी चालू करावी. २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या कालावधीतील ओपन मार्केट कोट्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भरा. सुकन्या समृद्धी खाते खोलण्यासाठी घेण्यात येणारे मेळे, आय.पी.पी.बी चे खाते व ए.ई.पी.एस ई. साठी टारगेटच्या नावावर कामगारांवर केली जाणारी सक्ती त्वरित बंद करावी. लॉकडाऊन काळातील गैर हजेरीचा कालावधी हा वर्क फ्रॉम होम असा गृहीत धरावा कामगारांच्या वैयक्तिक सुट्टी घेऊ नये.पोस्टमेंन व एम.टी.एस कॅडर च्या अंडर रुल 38 अंतर्गत ट्रान्सफर च्या ऑर्डर त्वरित प्रसिद्ध कराव्यात. आऊट सायडर पोस्टल एजेंट योजना ( OPA Scheme ) त्वरित बंद करावी, आदी मागण्या करण्यात आल्या असून राष्ट्रीय व सर्कल अध्यक्ष बाळकृष्ण हि. चाळके, राजेश सारंग यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Previous Articleशहरवासियांचे लक्ष मनपा वॉर्ड पुनर्रचनेकडे
Next Article लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के









