सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून सुनील काळेकर यांचे नाव जाहीर
सातारा / प्रतिनिधी
सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडी आज ऑन लाईन होत आहेत.त्याच अनुषंगाने काल प्रांत कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी भाजपच्या गोटातून चार जण गेले होते. दुपारी एक वाजता जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा फोन खणानला अन सुनील काळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली.त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच कोळेकर यांच्यावर शुभेच्छा सुरू झाल्या आहेत.आता फक्त निवडीची घोषणा बाकी आहे.
सातारा पालिकेत भाजपच्या कोट्यातून असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या रिक्त जागेसाठी दि.21रोजी ऑन लाईन निवडी होणार आहेत.भाजपमधून 11 जण इच्छुक होते. एकेक नाव मागे पडत गेले. काल कागदपत्रे तपासणी करता प्रांत कार्यालयात चौघे गेले होते.त्यामध्ये निष्ठावंत जयदीप ठुसे, सुणेशा शहा, डॉ.उत्कर्ष रेपाळ आणि सुनील काळेकर यांचा समावेश होता.जयदीप ठुसे यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता होती परंतु दुपारी 1 वाजता जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा फोन आला की सुनील काळेकर यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी चिठी काढली आहे.त्यांचाच अर्ज भरा.तसा आदेश मिळताच सुनील काळेकर यांनी आपला अर्ज दाखल केला.त्यामुळे आता आज दुपारी केवळ निवड होण्याची घोषणा विशेष सभेत दुपारी होणे उरले आहे.सुनील काळेकर यांना शुभेच्छा संदेश येऊ लागले आहेत.दुपारी निवडी होणार आहेत.
Previous Articleपर्वरीत भटक्या जनावरांची वाढती समस्या
Next Article कळंगुटात सट्टेबाजीची सहा प्रकरणे









