माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले व गजवडी ग्रामस्थांचे श्रमदान
वार्ताहर/कास
उरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड झाले होते. कोणीही यावे आणि मृत जनावरे आणि कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याचा नाहक त्रास हा स्थानिक तसेच पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणाऱ्या गावांना होत असल्याने याची दखल माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी घेतली. गजवडी ग्रामपंचायतीशी संपर्क साधत या परिसरात श्रमदान सुरू केले. आज सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैया भोसले, पंचायत समिती उपसभापती अरविंद बापू जाधव, गजवडीचे सरपंच बल्लाळ, उपसरपंच धनाजी कदम यांच्या उपस्थितीत श्रमदानात सुरुवात करण्यात आली.
यावेळी हा परिसर जेसीबी मशीन ट्रॅक्टर च्या साह्याने सुमारे 15 ट्रॉली कचरा उचलण्यात आला. परिसरात रंगरंगोटी करून सुशोभीकरण करीत कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. या नदीपात्रातच अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत. आता या सर्व गावांना शुद्ध पाणी मिळेल या परिसरातील गावांतून जे व्यवसायिक आहेत. त्यांनाही ग्रामपंचायतीने कचरा न टाकण्याचा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
गाव मोडा आणि श्रमदान
गावच्या हिताची कामे करताना प्रशासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी एकत्रित येऊन श्रमदान केल्यावर स्वच्छता मोहीम तर होतेच पण गावची एक ही दिसून येते गावोगावी आपले नदी नाले ओढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी स्वच्छ केल्या तर रोगराई पसरणार नाही. – राजू भैय्या भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य
स्वच्छतेने पर्यटनाचा दर्जा उंचावेल
परळी खोरे म्हटल की निसर्गाचा वरदहस्त. त्यातच उरमोडी जलाशयाचे विहंगम दृश्य सज्जनगड चा विस्तीर्ण डोंगर आण ठोसेघरचा कोसळणारा धबधबा यांसारखी पर्यटन स्थळे पहायला हजारो पर्यटक या भागात येत असतात. परंतु कचऱ्याचे साम्राज्य पहिल्याने पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येते आपण जर स्वच्छता ठेवली तर नक्कीच या भागातील पर्यटनाचा दर्जा ही तितकाच वाढेल. – धनाजी कदम, उपसरपंच गजवडी











