प्रतिनिधी / सातारा :
सातारच्या डॉ. शुभांगी गायकवाड यांनी शिवजयंती दिवशी किल्ले राजगड ते किल्ले अजिंक्यतारा असा 111 किलोमीटरचा प्रवास नववारी साडी नेसून पूर्ण केला. याबद्दल श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार केला.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, डॉ. शुभांगी यांनी या विक्रमांच्या माध्यामातून महिलांना नवी प्रेरणा दिली आहे. कोणत्याही वयातील महिला विक्रम करू शकते. हे त्यांनी दाखवून दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी अनेक विक्रम करावे अशी सातारकरांची इच्छा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा आहेत. उदयनराजेंनी केलेल्या या सत्काराबद्दल डॉ. शुभांगी गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले.









