प्रतिनिधी / उंब्रज
आशियाई महामार्गावर उंब्रज ता.कराड गावच्या हद्दीत तारळी पुलाच्या वळणावर घोडे घेवून जाणारी रुग्णवाहिका रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. तसेच दोन घोडे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावरुन दोन घोडे भरून रुग्णवाहिका सातारा ते कोल्हापूर लेन जात असताना चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्यावर पलटी झाली व सुमारे पन्नास फुट फरफरट गेली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंगचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अपघातात दोन घोडे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने रुग्णवाहिकेला हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग ईनचार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, धनाजी घारे, रोहित जाधव, हेमंत घाडगे तसेच उब्रंज पोलिसांनी मदतकार्य केले.