५२ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
वार्ताहर / कास
जावली तालुक्यातील उंबरीवाडी गाव कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट बनले असून जेमतेम २५० च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या गावात तब्बल ५२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरीतांची तपासणी मोहिम सुरु आहे. त्यामुळे गावासह बामणोली विभागातील नागरिकांना कोरोनाची धडकी भरू लागली आहे.
बामणोली विभागात दुर्गम समजल्या जाणाऱ्या उंबरीवाडी गावची लोकसंख्या जेमतेम २५० च्या आसपास असुन या गावात प्रथम ४ सप्टेबर रोज २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढले. त्यानंतर गावातील नागरिकांची तपासणी मोहीम बामणोली प्रथमीक आरोग्य केद्रांचे आधीकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांच्या पथकाने सुरू केली. यामध्ये दिनांक 6 रोजी २० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले दि. ७ रोजी ७ जणांचे स्वॅब तपासणीस दिले होते. त्यामध्ये ३ पॉझिटिव्ह ८ रोजी १३ जणांपैकी ८ पॉझिटिव्ह दि.१० रोजी २४ जणांपैकी १० पॉझिटिव्ह व ११ रोजी ६६ जणांपैकी १४ जण पॉझिटिव्ह झाले असून तब्बल आतापर्यंत १३२ जणांच्या स्वॅबची तपासणी केली आहे. त्यामधील ५२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून गावातील अन्य काही जणांबरोबर परिसरातील अनेकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. कोरोनाचा आकडा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली असून उंबरी गाव आता कन्टेन्टमेंट झोन बनले आहे.
या गावतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गावातील सरपंच, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत शिपाई, विज वितरणचा इलेक्ट्रेशन कर्मचारी आदीचा समावेश असून परिसरामध्ये घबराटीचे वातारण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये स्वत:हुन ग्रामस्थांनी लॉकडाऊन केले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.









