स्पर्धेत सुयश मिळवणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी
प्रतिनिधी/नागठाणे
इस्त्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘सायबर टेस्ट कॉम्पिटिशन’ मध्ये सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बारावीत शिकत असलेल्या व भरतगाव (ता.सातारा) येथील रहिवासी असलेल्या समृद्धी सत्यनारायण शेडगे हिने ११ वा क्रमांक पटकावला आहे. हा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिचे वडील सत्यनारायण शेडगे हे पत्रकार म्हणून कार्यरत असून आई भरतगाव येथे अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
‘पुढील दोन दशकात अंतराळात कोणती आव्हाने येतील?’ असा प्रश्न उपस्थित करत इस्त्रोने ही हिंदी भाषेतील निबंध स्पर्धा आयोजित केली होती. याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इस्त्रोने या स्पर्धेसाठी लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ २,२९८ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धेकांचा समावेश असून निम्म्याहून अधिक मुली आहेत. या मुलींमध्ये समृद्धी शेडगेचा समावेश आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या स्पर्ध्येत निवड झालेली समृद्धी शेडगे ही एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे
पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा महानगरातील विद्यार्थ्यांना मागे टाकत सातारसारख्या निमशहरी गावात शिकणाऱ्या आणि भरतगावसारख्या खेड्यात राहणाऱ्या समृद्धीने हिंदी भाषेत लिहिलेल्या निबंधाची निवड करण्यात आली आहे. तिच्या या सुयशाबद्दल तिचे परिसरातील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, समृद्धी हिने मिळवलेले यश दैदीप्यमान असून आमच्या महाविद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थिनीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लवकरच तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात येणार असल्याचे प्राचार्य बी. टी. जाधव यांनी व्यक्त केला.
भरतगाव सारख्या छोट्या गावात राहणाऱ्या समृद्धीने मिळवलेले हे यश खूपच प्रशंसनीय आहे. पालक म्हणून तिचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.- सत्यनारायण शेडगे, पालक
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









