प्रतिनिधी / सातारा
जुन्या प्रथा परंपरा आजही काही ठिकाणी आवर्जून पहायला मिळतात. अगदी पिढ्यान पिढ्या ती परंपरा सुरू असते. अशीच परंपरा किल्ले रायरेश्वरच्या पायथ्याला असलेल्या वडतुंबी गावात पहायला मिळत आहे. गावापासून काही अंतरावर एका चाफ्याच्या झाडाखाली एका जांभ्या दगडातले शिल्प आहे. त्या शिल्पाला गावातील नागरिक गावाबाहेर जाताना दगड फुल म्हणून वाहतात. ही प्रथा पाहून पाहणाऱ्यांना ही आश्चर्य वाटेल.
आज जग कितीही सुधारले वैज्ञानिक क्रांती झाली असली तरीही ज्या जुन्या चाली जुन्या प्रथा अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत. अशीच एक प्रथा किल्ले रायरेश्वरच्या पायथ्याला वसलेल्या वडतुंबी या गावात आहे. गावची लोकसंख्या जेमतेम 1200 च्या आसपास असावी. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर माळावर एक जांभा दगडाचे शिल्प आहे. ते शिल्प चाफ्याच्या झाडाखाली आहे. गावातून कोणीही बाहेर पडताना थोड थांबून दगड फुल म्हणून वाहण्याची प्रथा आहे.
याप्रथेबाबत ग्रामस्थ सांगतात की आम्ही आज पर्यंत पहात आलो आहे. तसा या चाफ्याखाली हे शिल्प आहे.या शिल्पाला व या जागेला सती आईचा चाफा म्हणतात. ती महिला तपस्वी असावी, जाताना दगड फुल म्हणून वाहिले जाते. जेव्हा गावाला पाऊल वाट होती. रस्ता नव्हता त्याही अगोदरपासून ही प्रथा सुरू आहे. आम्ही त्या शिल्पाबाबत व प्रथेबाबत शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे, असे ग्रामस्थ साळेकर यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









