प्रतिनिधी / गोडोली
अंगापूर (सातारा) येथील तुकाराम अंतू कणसे यांच्या पत्नी इंदूबाई तुकाराम कणसे (काकी) वय- ७८ यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि.२५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर अंगापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सासपडे गणेश स्टोन क्रशरचे मालक हणमंतराव (बापू ) कणसे आणि पोवई नाक्यावरील विजय टुरिस्ट बॅग हाऊसचे मालक दादा कणसे यांच्या त्या मातोश्री होत्या. रक्षा विसर्जन आणि दहाव्याचा विधी रविवार दि.२७ डिसेंबर रोजी अंगापूर येथे सकाळी ९ वा.होणार आहे.









