प्रतिनिधी / सातारा
आशा सेविका कोरोनाचा सर्व्हे घरोघरी जाऊन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आशानां कोरोनाच्या सर्व्हेसाठी सर्व ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, बाधित भागासाठी फेसशिल्ड मिळावे अशी मागणी सातारा जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्ष आनंदी अवघडे यांनी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी रूपाली पवार, सुषमा माने, शबाना तांबोळी व इतर आशा सेविका उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले की, आशांनी रोज किती घरांचा सर्व्हे करावा हे निश्चित करावे. नवीन आलेल्या लोकांची यादी करणे, रोज 25 ते 40 लोकांचे सर्दी, खोकला असणारे यादी देणे रोज 14 दिवस त्या लोकांना भेटी देणे. विटामिन ए ची मोहिम करणे इ. कामे आशांना करावी लागत आहेत. ही सर्व कामे आशांना करणे शक्य नाही. त्याचे नियोजन करून द्यावे. बाधित आशांना सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक न देता आरोग्य कर्मचाऱयांप्रमाणे सेवा मिळावी. आशांना सर्वेसाठी रोज 300 रूपये भत्ता मिळावा, वाढीव मानधन त्वरीत मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाकडून या मागण्याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आशा सेविका जीवधोक्यात घालून कामे करत असल्याचे अवघडे यांनी सांगितले.
Previous Articleलॉकडाऊनमध्ये वाढला ताण – तणाव, अनेक तरूण बेरोजगार
Next Article कर्नाटक: जुलैच्या पेरणीनंतर पिकांचे विक्रमी नुकसान









