सातारा / प्रतिनिधी :
आनेवाडी टोल नाक्यावर केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल झालेल्या भुईंज पोलीस ठाण्यातल्या गुन्ह्याचे चार्ज सीट वाई न्यायालयात दाखल झाले. त्याच्या सुनावणी प्रकरणी वाई न्यायालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते हजर झाले. सकाळी अकरा वाजता वाई न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती.









