प्रतिनिधी/सातारा
पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. ज्या महामार्गासाठी लोकांच्या खिशातून टोल घेतला जातो, त्याच टोलचा झोल वारंवार गाजला आहे. लॉकडाऊन काळात वाहतूक पूर्ण ठप्प झाल्याने वाद काहीसा थांबला होता. प्रशासनाने याबाबत वरवरचा बदल केला आहे. टोल नाक्यावर सुटाबुटातले बॉडी गार्ड ठेवल्याचे दिसू लागले. फास्ट टॅगची सोय चांगली आहे.पण याच फास्ट टॅगच्या नावाखाली चक्क लूट सुरू असल्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे.
काल, रविवारी (दि.6) काही सातारकर पुण्याहून सातारला येत होते. यांच्याकडून दुप्पट आकारणी टोलची करण्यात येईल, असे सांगण्यात येताच वाहनधारकांनी चांगलाच जाब विचारला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.









