सातारा / प्रतिनिधी:
कोरोना काळात कैलास स्मशानभूमीत अनेक मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते.या अंत्यसंस्कारावेळी सर्व काळजी घेणारा दिव्यांग असा सचिन सोनावणे याचा सत्कार खासदार उदयनराजे यांनी केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख या उपस्थित होत्या.यावेळी उदयनराजे म्हणाले, आत्म्याची काळजी घेणारा माणसातील माणूस.
सचिन बाबुराव सोनावणे ही व्यक्ती सातारा स्मशानभूमीत कायम आपणास दिसेल. अंत्यविधीच्या वेळी आपण आपल्या दुःखात पूर्ण बुडालेले असतो परंतु तिथे सचिन ही एकमेव व्यक्ती असेल की ती शेवटच्या प्रेताला संपूर्ण अग्नी मिळावी यासाठी प्रयत्नशील असतो मग वेळ कितीही असो या प्रामाणिक माणसाचा सन्मान करणे हे आमचे भाग्य समजतो. तसेच कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता सेवा केली.
या व्यक्तीला मदत करणे व सन्मान करणे हे आम्ही आमचे आद्यकर्तव्य समजतो, असे त्यांनी सांगितले
Previous Articleसातारा : जिल्ह्यात 5 तालुक्यात कोरोना रुग्णांची एक अंकी वाढ
Next Article सातारा : खंडाळ्यात बहुजन संघर्ष समितीचा मोर्चा









