सातारा / प्रतिनिधी
सद्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरू आहे.या निवडणूकीची आचार संहिता सुरू असून त्याचे उल्लंघन सातारा शहरातील भाजपच्या नगरसेविका सौ.सिद्धी पवार यांनी केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांनी केली आहे.त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश मुख्याधिकारी व पोलिसांना दिले आहेत.
पद्माकर सोळवंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू आहे.या दरम्यान कोणत्याही राजकीय नेत्याला व पदाधिकाऱ्यानी पक्ष अथवा उमेदवार यांच्या हितसंबंधाने मदत होईल असे वर्तन करणे चुकीचे आहे.मात्र, सातारा शहरात रविवार दि.8रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रभाग 17 च्या नगरसेविका सौ.सिद्धी पवार यांनी प्रभागातल्या नागरिकांना कोणतीही परवानगी न घेता डसबिनचे मोफत वाटप केले.डसबिनवर भाजपचे चिन्ह व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह नगरसेविका सिद्धी पवार यांचा फोटो असलेले स्टिकर आहे.त्यामुळे आचारसंहिता भंग झाली असून चौकशी होणे अपेक्षित आहे.तसेच त्या कार्यक्रमाचे फोटो त्यांचे पती रवी पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून आचारसंहिता भंग केली आहे.त्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी यांना चोवीस तासात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









