प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील आंबेदरे येथे बिबट्याची दहशत असून बाबुराव जाधव यांच्या जनावरांच्या शेडमधून रेडकावर हल्ला केला. त्या हल्ल्यात रेडकू मृत झाले आहे. दरम्यान, गावातली मृत कुत्री बाभळीच्या झाडावर आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
सातारा शहरालगत बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते. शहरापासून जवळच असलेल्या आंबेदरे या गावात ही बिबट्याचे दर्शन अधूनमधून होत असते. गावातील बाबुराव जाधव यांच्या शेडमध्ये म्हैशी आणि रेडक असतात. शुक्रवारी बिबट्याने शेडमध्ये शिरून रेडकावर हल्ला केला. हल्ल्यात रेडकू मृत झाले. मालक बाबुराव जाधव यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी कालवा केला. दरम्यान, गावात बाभळीच्या झाडावर मृत कुत्री आढळून येत असल्याने बिबट्याच ही कुत्री मारून टाकत असेल अशी भीती व्यक्त होत आहे.
Previous Articleबेळगाव जिल्हय़ात शनिवारी 411 कोरोनाबाधितांची नोंद
Next Article सांगली जिल्हय़ात आज कोरोनाचे चार बळी, नवे 95 रूग्ण







