सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारालगत एक कचराकुंडी ओव्हरफ्लो झाली होती. ही कचराकुंडी स्वच्छ करण्याची शिवभक्तांकडून मागणी होताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती कचराकुंडी स्वच्छ केली.
गोडोलीचे सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. आता किल्ले अजिंक्यतारा येथील मुख्य दरवाजालगत असलेली कचरा कुंडी नियमित स्वच्छ होणार आहे.









