पालिका प्रशासनाला दिला निवेदनाद्वारे इशारा
सातारा / प्रतिनिधी :
सातारा नगरपालिकेमधील सदर बाजार परिसरात मागासवर्गीय वसाहतीमध्ये लाखो रुपये खर्चून समाज मंदिर बाधंले. विशेषताः समाज मदिंरावर दोन वेळा रंगरंगोटी केली. तरी ही समाज मंदिर अद्याप तेथील लोकांच्या ताब्यात दिले नाही, लवकरचल लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा रिपाइं उद्घाटन करेल, असा इशारा रिपाइंने नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेेेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व इतर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सदर बाजार येथील मिलिंद कॉलनी परिसरात लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम व कोणते ही समाजकार्य करण्यास जागा नाही. महिलांना बैठक अथवा मेळावासाठी जागा नाही. विशेष म्हणजे जरंडेश्वर नाका मिलिंद कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्रींचे भिमाई स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक बाहेर गावावरून येतात. तेथील काम सुरू असलेने मिलिंद कॉलनीतील समाज मंदिराचा स्मारकात येणाऱ्या लोकांना ही फायदा होईल. त्यामुळे संबधित समाज मंदीर त्वरीत लोकांसाठी खुले करा. अन्यथा रिपाई लोकार्पण करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.









