सातारा / प्रतिनिधी :
शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिकेकडून होत नाही. आठ दिवसात शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिकेने केला नाही, तर मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या केबिनमध्ये भटकी कुत्री सोडण्यात येतील, असा इशारा साविआचे नगरसेवक विशाल जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, सदर बाजार परिसरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातून बालिका वाचल्याचे मी नुकतेच बातम्यात पाहिले. सदर बाजारामध्ये मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना फिरणे मुश्किल झाले आहे. पालिकेने आठ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आपल्या केबिनमध्ये कुत्र्यांची पिल्ले आणून सोडण्यात येतील, होणाऱ्या परिणामास व कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपण जबाबदार रहाल असा इशारा त्यांनी दिला आहे.