प्रतिनिधी/वडूज
कोरोना संसर्गाचा धोका आपल्या मुलांना होऊ नये, यासाठी त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी येथील मुंबई पोलीस व आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका दांपत्याने घेतला आहे. दोघेही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुलांपासून स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जोपर्यंत कोरोनामुक्त वातावरण होत नाही तोपर्यंत ते कुटुंबापासून वेगळे राहणार आहेत. समीर गायकवाड व रुपाली गायकवाड असे या दाम्पत्याचे नाव असून त्यांच्या या निर्णयाला ‘सॅल्युट’ केला जात आहे.
मुंबई पोलीस कॉन्स्टेबल समीर गायकवाड व रुपाली गायकवाड आरोग्य विभाग उरण येथे आपले कर्तव्य बजावत आहेत. गायकवाड कुटुंब मूळचे सुर्याचीवाडी येथील मात्र ते सध्या कळंबोली नवी मुंबई येथे स्थाईक आहेत. त्यांना एक वर्षाचा मुलगा व चार वर्षांची मुलगी आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आपले राहते गावी आज्जी-आजोबा जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला याचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघेही खबरदारी घेत आहेत. मात्र अधिक खबरदारी घेण्यासाठी त्यांनी कोरोना जाईपर्यंत मुले व आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकल्यानंतर लहान असणाऱ्या दोन मुलांपासून वेगळे राहायचे या विचाराने त्यांचे मन चलबिचल झाले. मात्र कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी हा निर्णय घेऊन लॉकडाऊन सुरू झाल्यापासून वेगळे राहण्यास सुरवात केली. या बाबत त्यांच्या गावामध्ये माहिती पसरल्यानंतर या दाम्पत्याचे कौतुक होत आहे. दरम्यान, सर्व गावातील व्यक्तींनी जबाबदारीने वागून घराबाहेर फिरणे टाळावे तसेच स्वतः व आपल्या कुटुंबियाला सुरक्षित ठेवावे अशी प्रतिक्रिया मुंबई पोलीस कॉन्स्टेबल समीर गायकवाड यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








