वार्ताहर / कास
गेल्या साडे पाच महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला चाकरमानी अखेर लॉकडाऊनचे नियम शिथील होताच रोजगारासाठी शहरांकडे धाव घेऊ लागला आहे. कोरोनाचे वाढते भय डोक्यावर घेऊन रोजगाराशिवाय पर्यायच नाही असं म्हणत चाकरमान्यांनी अखेर गावातुन शहरांकडे परतीच वाट धरली आहे.
कोरोनाने देशात प्रवेश केला अनं अनेकांना पाच महीने कुंटंब जगवण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले, तरीही लॉकडाऊनचे नियम पाळुनही कोरोना काही केल्या गायब होईना ना त्याचा प्रद्रुर्भाव कमी होईना अखेर कोरोनानेच त्याचा विळखा वाढवत शहरांसह खेडयापाडयात पाळेमुळे घट्ट केली आहेत. त्यामुळे कोरोनासाठी गाव आणी शहर आता सारखंच झालं असुन गावात राहण्यापेक्षा शहरांत काहीतरी हाताला रोजगार मिळेल या आशेपोटी चाकरमानी पाच महीन्याच्या प्रतीक्षेनंतर पुणे मुंबई सातारा शहराकडे परतु लागला आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे चाकरमानी आर्थिक संकटात सापडला असुन त्याला रोजगाराशिवाय कोणताच पर्याय नाही गावात किमान जगण्यासाठी शासनाच्या मोफत रेशनिंगच्या धान्याचा सुद्धा मुंबईत रेशनकार्ड असल्याने व ते तेथेच राहील्याने लाभ मिळला नाही कर्जाच्या हप्ते व त्यांचे व्याज वाढु लागले मुंबईतील राहत्या घराचे भाडे वाढु लागले खाजगी कंपन्यांच्या नोकरकपाती मुळे हातातील रोजगार जाईल व बँक पतपेढी व घरमालकांचा पैसे भरण्यासाठी तगादा वाढुन त्याचा बोजा वाढु लागल्याने येत्या काळात आपलं दिवळं निघणार या भिती पोटी अखेर व लॉकडाऊनचे नियमही शिथील होऊ लागल्याने गणपतीचा सण साजरां होताच अनेक चाकरमान्यांनी अखेर रोजगारासाठी शहराची वाट धरली आहे.
Previous Articleकरमाळा तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ
Next Article नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलतील : पियुष गोयल









