जिल्ह्यात दहा पथकांच्या वीस कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी
सातारा/ प्रतिनिधी
आज, शनिवार (दि. 29) पासून सातारा जिल्हयातील कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेश सुरु झाले. दोन दिवसांपूर्वी माध्यमिक विभागाच्या पथकांच्या अचानक भेटींनी महाविद्यालय प्रशासन अलर्ट झाले होते. कोरोना पार्श्वभूमी असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी प्रवेश फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाली होती. त्यांनतर शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार प्रत्यक्ष प्रवेशाचे चांगले नियोजन केल्याचे आज पुन्हा केलेल्या तपासणीत आढळून आले. गर्दी होण्याची शक्यता असलेल्या निवडक २० कनिष्ठ महाविद्यालयांना आज विभागाने अचानक व्हीजिट्स दिल्या. जिल्हयातील कनिष्ठ महाविद्यालयास पुढील अधिका-यांनी भेटी देवुन प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतली.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स सातारा व धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा या दोन्ही ठिकाणी शिक्षणाधिकारी, प्राथमिक प्रभावती कोळेकर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीकांत जगदाळे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग माध्यमिक यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा व महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातारा येथे साईनाथ वाळेकर, सहा.शिक्षण उपनिरिक्षक, शिक्षण विभाग माध्य.जि.प.सातारा यांनी भेट देवून तपासणी केली.कला वाणिज्य कॉलेज सातारा येथे मनिषा चंदुरे, व लाल बहादुर शास्त्री कॉलेज सातारा येथे जयश्री शिंगाडे या शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेटी देवून प्रवेश प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन केले.
पाटण तालुक्यातील बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण व ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पाटण या ठिकाणी उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी भेट देवून प्रवेश प्रक्रियेची पहाणी केली.वाई तालुक्यातील किसनवीर महाविद्यालयात उपशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी भेट देवून प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतली.
फलटण तालुक्यातील मुधोजी कॉलेज फलटण, मुधोजी हायस्कूल व ज्युनि.कॉलेज फलटण,मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि.कॉलेज फलटण, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनि.कॉलेज फलटण,
तसेच वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनि.कॉलेज फलटण येथे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश क्षीरसागर व गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी भेट देवून प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेसाठी सूचना दिल्या.
कराड तालुक्यात सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी भेट दिली.कोरेगांव तालुक्यातील डी.पी.भोसले महाविद्यालयाला विशाल कुमठेकर, शिक्षण विस्तार अधिकारी,पं.स.कोरेगांव यांनी भेट दिली.तर माण तालुक्यातील दहिवडी कॉलेज दहिवडी येथे सोनाली विभुते, गटशिक्षणाधिकारी, पं.स.माण यांनी भेट दिली.
कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर, गर्दी टाळण्यासाठी वेबसाइट, व्हाट्स अॅप, एस एम एस चा वापर, शाखानिहाय स्वतंत्र काऊंटर, टक्केवारी किंवा शाखानिहाय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचे विभाजन, पालक व विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबरची सोय, दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्राप्त अर्ज संख्या व क्षमता, स्वत: प्राचार्यांचे प्रक्रियेवरील संनियंत्रण,आकारलेले शुल्क,गुणवत्तेनुसार प्रवेश इत्यादी मुद्द्यांची तपासणी करण्यात आली.
शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांना राज्यातील आठ शैक्षणिक विभागांपैकी एका महत्त्वपूर्ण विभागाची पदोन्नतीने लवकरच जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शिक्षण विभागात चर्चा आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक विभागातील बाबी व प्रवेश प्रक्रियेवर बारकाईने लक्ष घालून घातले असून जाता जाता त्यांच्या कारवाईचा फटका बसू नये याची काळजी कनिष्ठ महाविद्यालयांनी घेतल्याचे दिसते. जिल्हयातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देण्याबाबत त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना लेखी सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पालक, विद्यार्थी व काही संघटनांकडून शुल्क कमी करण्याबाबत मागणी केली जात आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षणाधिकारी क्षीरसागर म्हणाले, गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यितबाबत शुल्क निर्धारित करण्याचा अधिकार शुल्क अधिनियमानुसार पालक-शिक्षक समितीला आहे. चालू वर्षी शुल्क कमी करणे, टप्प्यात टप्प्याने भरणे, सक्ती न करणे याबाबत राज्यशासनाने ८मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकास मा. उच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्थगिती दिली आहे. तथापि संस्थांनी स्वत:हून शुल्क कमी करण्याबाबत पुढाकार घेऊन पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









