रस्ता दुरूस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात, येत्या चार दिवसात वाहतूक सुरु होणार
प्रतिनिधी / महाबळेश्वर
गेल्या दिड महिन्या पासून अंबेनळी घाटातील बंद असलेली वाहतूक गणेशोत्सवा पुर्वी सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने कंबर कसली आहे. घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी आता कॉक्रिट टाकण्याचे काम सुरू असून हे काम पुर्ण झाल्या नंतर येत्या चार दिवसात महाबळेश्वर पोलादपुर मार्गावरील वाहतूक पुवर्वत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटातील रस्ता खचून दरीत कोसळला होता. तर अनेक ठिकाणी मोठ मोठया दरडी कोसळल्या होत्या. यामुळे घाटातील रस्त्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ होती. 21 जुलै पासून गेली दिड महिने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ही वाहतुक सुरू करण्यासाठी सावर्जणिक बांधकाम विभागाने घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. मुसळधार पावसात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत हे काम सुरू करून केवळ दिड महीन्यात रस्ता दुरूस्तीचे काम पुर्ण होत आहे. त्यामुळे आता पुढील चार दिवसात या मागार्वरील वाहतूक सुरू होण्यास मदत होणार आहे.
या मार्गावरील वाहतुक सुरू होताच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली 22 गावेही आता महाबळेश्वर तालुक्याशी पुन्हा जोडली जाणार आहे. अंबेनळी घाटातुन वाहतुक सुरू होताच किल्ले प्रतापगडावरील पर्यटन सुरू होणार असुन पर्यटनावर अवलंबुन असेल्या अनेक कुटूंबांची उपासमार आता थांबणार आहे. तसेच चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे.
Previous Articleब्राझील, दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांना कोरोना नकारात्मक अहवालानंतरच विमानतळ सोडता येणार
Next Article दोडामार्गात हवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन









