सातारा / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कर्मचारी बदल्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे.आज बदल्यांचा शेवटचा दिवस असल्याने धांदल सुरू होती.सर्व बदली प्रक्रिया ऑन लाईन पारदर्शक अशी झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया मंगळवारी दि.4रोजी सुरू झाली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली या प्रक्रियेला सुरुवात झाली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यासह सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह विभागाचे प्रमुख उपस्थित होते.दि.4रोजी बांधकाम उत्तरच्या2 प्रशासकीय, 13 विनंती, 2 आपसी अशा17 बदल्या झाल्या.
एकात्मिक बाल विकास विभागात 5 प्रशासकीय, 2 विनंती, 2 आपसी अशा 9 बदल्या झाल्या.पशुसंवर्धन विभागातल्या 2 प्रशासकीय,6 विनंती अशा 8 बदल्या झाल्या.कृषी विभागाच्या 4 प्रशासकीय 1 विनंती अशा पाच बदल्या झाल्या.दि.5रोजी अर्थ विभागातल्या 5 प्रशासकीय बदल्या झाल्या.आरोग्य विभागातल्या 18 विनंती तर 2 आपसी अशा 20 बदल्या झाल्या.शिक्षण विभागात 3 प्रशासकीय, 2 विनंती अशा 5 बदल्या झाल्या.आज ग्रामपंचायत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या सुरू आहेत.







