प्रतिनिधी / सातारा
सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेसाठी शासनाने मान्यता देऊन तीन वर्षांकरिता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हस्तांतर करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. मेडिकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून जलसंपदा विभागाची जागा हस्तांतर झाली असून या जागेत १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून विध्यार्थ्यांना प्रवेश देऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद यांचेकडून महाविद्यालयाची पाहणी होणार आहे. या पाहणीसाठी तातडीने उपकरणांची उपलब्धता करणे आवश्यक असलेने त्या करिता सातारा जिल्हा बँकेने मेडिकल कॉलेजसाठी मदत करणेचा निर्णय घेऊन रक्कम रु. १५ लाखाचा डिमांड ड्राफ्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांचेकडे बँकेचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा .ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुपूर्त केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री. सुनिल माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदि.मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









