सह्याद्री प्रतिष्ठानच्या अंबरनाथ विभागाचे कार्य
प्रतिनिधी / सातारा
उभी कातळाची चढण, घनदाट झाडी. ओढ्यातली पाऊलवाट तुडवत दसऱ्याच्या मुहूर्तावर सहयाद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी चंदेरी बुरूजावर भगवा फडवण्याच्या निर्णय घेतला. सहयाद्री प्रतिष्ठानने राज्यातल्या गडावर दसऱ्याला भगवे फडकवले आहेत. मात्र, अवघड अशा चंदेरी बुरुजावर तब्बल 25 फुटी भगवा ध्वज फडकवला. त्या मोहिमेत सातारा जिल्ह्यातील प्रमोद भोसले पाटील हे सहभागी झाले होते.
सहयाद्री प्रतिष्ठानच्यावतीने राज्यातल्या महत्वाच्या गडांवर भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार केला. त्यानुसार विविध शाखानी कार्य दसऱ्याला पार पाडले. अंबरनाथ शाखेने दोन दिवसांची मोहीम आखली. चंदेरी बुरूजावर भगवा ध्वज फडकविण्याची. 50 दुर्ग सेवकामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रमोद भोसले-पाटील यांचा ही सहभाग होता.
ध्वजाचे साहित्य घेऊन सकाळी 8 वाजता चढण्यास प्रारंभ केला. जंगल, पाऊल वाट तुडवत दुर्गसेवकांनी दुपारी 2: 30 गुहे जवळ पोहचले. तेथून पुढे उभी चढण दोराच्या सहाय्याने साहित्य घेऊन दुर्ग सेवकांना अडीच तास लागले. बुरूजावर पोहचल्यावर तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत सोबत आणलेले ध्वजाचे साहित्य बसण्यास प्रारंभ केला. तिथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून सायंकाळी सहा वाजता 25 फुटी ध्वज उभा केला. पुन्हा परत फिरताना धुके दाटले. निसरडी वाट असल्याने एकमेकांच्या हातात हात घालून तो बुरुज उतरला. गुहेजवळ मुक्काम केला. हा थरारक अनुभव प्रमोद भोसले-पाटील यांनी तरुण भारतकडे व्यक्त केला.









