खेळाडूंचे म्हणजे जिल्हाधिकारी म्हणतील तसं : नियम पाळूच मैदाने बंदच राहिली तरी चालतील असा सूर
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात अनेक खेळाडू घडले आहेत.शहरात असलेल्या मैदानावर सराव करून आपला नावलौकिक वाढवला आहे.मात्र, याच खेळाडूंना सराव करण्यासाठी असणारी मैदाने तब्बल 215 दिवस झाले शट डाऊन आहेत.त्यामुळे सध्या खेळाडूंचा सराव हा मैदानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर भल्या सकाळी मॉर्निग वॉक करणे, धावणे हाच आहे. त्यामुळे शहरातील मैदाने बंदच राहिली तरी काहीही हरकत नाही, जिल्हाधिकारी म्हणतील तसं, अस खेळाडू म्हणत आहेत.
सातारा शहरात खेळाडू घडवणारी मैदाने म्हणजे छत्रपती शाहू क्रीडा संकुल, जिल्हा परिषद मैदान, क्रांतीस्मृती मैदान, गांधी क्रीडा मंडळाचे मैदान, शिवाजी उदय मंडळाचे मैदान अशी सर्वच मैदाने बंद आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व मैदाने बंद ठेवण्याचे आदेश असल्याने त्याचे तंतोतंत पालन करण्यात येत आहेत.त्यातच छत्रपती शाहू क्रीडा संकुलालगतच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जंबो हॉस्पिटल सुरू आहे.त्या जँबो हॉस्पिटलमुळे ही क्रीडा संकुलकडे कोणी जात नाही.
शिवाजी उदय मंडळाचे खेडाळू म्हणतात जिल्हाधिकारी यांचे नियम पाळू
शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर दररोज कब्बडी खो खो याचा सराव केला जात असतो.परंतु लॉक डाऊन मुळे हे मैदान बंद आहे.या मैदानावर सराव करणारे खेळाडू हे जिल्हाधिकारी जे नियम सांगतील तेच आम्ही पाळू असे एक खेळाडू तथा प्रशिक्षकाने तरुण भारतशी बोलताना सांगितले.









