प्रतिनिधी/ सातारा
येथे पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रातील पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीतर्फे बॉलीवूडमधील नामवंत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे दहा दिवसांचे डान्स कार्यशाळेचे आयोजन 20 ते 30 जानेवारीला पोलीस करमणूक केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेची माहिती सातारकरांपर्यंत पोहोविण्यासाठी शहरामधून ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी रॅली काढली. त्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेच्या नावनोंदणीसाठी सुरवात झाली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्कशॉपला राज्यासह इतर राज्यातून विद्यार्थ्यांची नोंदणी होत असून स्थानिक विद्यार्थ्यांनीही यात सहभागी व्हावे. तसेच या कार्यशाळेसाठी पंकज चव्हाण ऍकॅडमीमार्फत विविध सवलती दिल्या जाणार आहेत. यामध्ये महिलांसाठी विशेष बॅच असून फीमध्येही सवलत देण्यात येणार आहे. ग्रुप, तसेच सैनिक पाल्यास वेगळी सवलत, परराज्यातून येणाऱया विद्यार्थ्यांना निवास व जेवणांची माफक दरात सोय केली जाणार आहे. दहा दिवसांच्या कार्यशाळेत दिवसांत सहा बॅचेस घेतल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत लहान मुले, साडेतीन ते 60 वर्ष वयोगटातील सर्वांना सहभागी होता येणार आहे. गणेश आचार्य यांनी बॉलीवूडमधील गोविंदा ते रणवीर सिंग, करिष्मा कपूर ते कॅथरिना कैफ या नामवंत कलाकरांना आपल्या कलेने यशाचा शिखरावर नेले आहे. अशा सिनेतारकांना घडविणारे आचार्य प्रथमच सातारकारांना या नृत्याचे धडे देणार आहेत. कार्यशाळेच्या अखेरच्या दिवशी (ता. 30) सहभागी विद्यार्थ्यांसह गणेश आचार्य यांच्या कलाविष्काराचे आयोजन केले जाणार आहे.
या संधीचा जास्ती-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी पंकज चव्हाण 9764406464 डान्स ऍकॅडमी येथे संपर्क करावा, असे पंकज चव्हाण यांनी केले आहे.
‘ ची मागणी यावेळी करण्यात आली.









