जर्काता
जगातील ज्वालामुखीचा देश म्हणून मागील 700 वर्षांपासून इंडोनेशियाला ओळखले जाते. 141 ज्वालामुखीपैकी सध्या 130 ज्वालामुखी सक्रीय असल्याची माहिती आहे. यातील माउंट ब्रोमो पर्वतावर असणारा ज्वालामुखी हा जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखण्यात येतो. परंतु विशेष गोष्ट म्हणजे इंडोनेशियातील लोक इतक्मया भीतीदायक असणाऱया ठिकाणी असणाऱया पुरा लुहार पोटेन नावाच्या गणेश मंदीराला जाण्याचे थांबलेले नाहीत आणि या पुजेमुळेच आम्ही सुरक्षित असल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. माउंट ब्रोमोचा अर्थ असा आहे,की स्थानिक लोकांकडून वापरण्यात येणाऱया भाषेला ब्रम्हा असे म्हणतात. त्यावरुनच सदरच्या पर्वताला नामकरण करण्यात आले आहे. मागील 700 वर्षांच्या कालावधीपासून पर्वतरांगाच्या डोक्मयावर आजही अस्तित्वात असणारी गणेशमूर्तीच आमचे संरक्षण करत आहे. इतकी भयानक संकटजन्य स्थिती असतानाही कोणाच्याही जीवावर संकट कोसळत नसल्याचेही अनेकांकडून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.









