वारणानगर / प्रतिनिधी
सातवे ता. पन्हाळा येथील सदाशिव हरी पवार ७० रा.इस्लामपूर या वृध्दाने रहात्या घरी तुळईला गळफास लावून दुपारी आत्महत्या केली.
सदाशिव हे मूळगांवी सातवे येथे इस्लामपूरहून रिक्षाने आज गुरुवारी आले होते. ते इस्लामपूरला परत त्याच रिक्षाने जाणार होते.
तथा त्यांनी रिक्षावाल्यास परत जायला सांगून तदनतंर तुळईस गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. कोडोली पोलीसात घटनेची नोंद झाली आहे.









