वारणानगर / प्रतिनिधी
सातवे ता. पन्हाळा येथे अज्ञात चोरट्याने सुमारे ४१ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १० हजार असे सुमारे ५१ हजार रू. वरडल्ला मारला. बुधवार दि. २४ रोजी पहाटे घडलेल्या घटनेची फिर्याद सुरज गौतम कांबळे यांनी कोडोली पोलिसात दिली आहे याबाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सुरज कांबळे यांच्या घरात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा न लावलेल्या दरवाज्यातून प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या तिजोरीच्या चाव्या घेवून दागिने व रोख रक्कम लपांस केली. घरातील लोक पहाटे उठल्यानंतर तिजोरीचे दार उघडे असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी त्यानी तिजोरीतील दागिने बाबत तपासणी केली असता व रोख रक्कमेसह दागिने नसल्याचे दिसून आले.
चोरट्याने सोन्याचे नेकलेस, डोर्ले, कानातील रिंगा व रोख रक्कम दहा हजार असे रू ४१४०० लपांस केलेचे दिसून आले.पोलीसानी आज दिवसभर श्वान पथकाऱ्या सहाय्याने तपास केला तथापी काही ठोस हाताला लागले नाही सातवे – रोडवर खामकर यांच्या घरी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला तथापि त्याची नोंद पोलीसात झालेली नाही अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक दिनेश काशीद करीत आहेत.