30 टक्के अभ्यासक्रम वगळल्याने परिणाम, सहावी व दहावीच्या पुस्तकातील सारांश तसाच
प्रतिनिधी/ बेळगाव
यावर्षी कोरोना असल्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने 30 टक्के अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाठय़पुस्तक तज्ञ मंडळींनी काही घटक अभ्यासक्रमातून वगळले आहेत. यामध्ये म्हैसूरचा राजा टीपू सुलतान यांचा धडा सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यात आला आहे. परंतु सहावी व दहावीच्या पाठय़पुस्तकातून ‘टायगर ऑफ म्हैसूर’ हा धडा तसाच ठेवण्यात आला आहे.
सोमवारी पाठय़पुस्तक मंडळाने ऑनलाईन पाठय़पुस्तके अपलोड केली आहेत. यावषी कोरोनामुळे 220 पैकी केवळ 120 दिवस शाळा भरेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्या पद्धतीने अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. तज्ञ मंडळींनी एकत्रित येवून अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर्नाटक पाठय़पुस्तक मंडळाचे संचालक माधेगौडा यांनी सांगितले आहे.
सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहावीमध्ये टीपू सुलतानाविषयीची माहिती घेतलेली असल्याने ती पुन्हा न देता ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना दहावीमध्येही टीपू सुलतानाचा अभ्यास असणार आहे. त्यामुळे हा धडा वगळण्यात आला आहे.
याबरोबरच टीपू सुलतानचा मोठा मुलगा हैदरअलीचाही इतिहास वगळण्यात आला आहे. याचबरोबर राणी चन्नम्माचा इतिहास असायनमेटद्वारे शिकविला जाणार आहे. सहावीच्या पुस्तकातील ख्रिश्चन व इस्लामिक माहिती वगळण्यात आली आहे. याचबरोबर राणी अक्कमहादेवी, उमाबाई यासारख्या महिला क्रांतीकारकांची माहिती थोडक्मयात देण्यात आली आहे. विजापूर व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सातवीच्या इतिहासामध्ये थोडक्मयात देण्यात आला आहे.