प्रतिनिधी / दापोली
कृषि विद्यापीठ सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरणारी तीन लाभाच्या सुधारीत सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाहित सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करणेसाठी राज्यातील चारही विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी 27 ऑक्टोबर पासून आंदोलन करणार आहेत.
चारही कृषि विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी आता 27 ऑक्टोबर पासून आंदोलन करणार आहेत. या नुसार कृषी विद्यापीठ सेवेतील अधिकारी व कर्मचारी हे 27 ऑक्टोबर रोजी दापोली येथे सामाजिक अंतर राखून एकत्र येऊन काळया फिती लावून निवेदन सादर करुन काम करतील. तसेच कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महाविद्यालयचे, संशोधन केंद्र येथील सर्व अधिकारी व कर्मचारी हे त्या त्या मुख्यालयासमोर सामाजिक अंतर राखून एकत्र येऊन काळया फिती लावून काम करतील.
2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी लेखनी बंद आंदोलन करतील. 6 नोव्हेंबर रोजी सर्व अधिकारी व कर्मचारी एक दिवस सामुहीक रजा देऊन आंदोलन करतील. 7 नोव्हेंबर रोजी सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखणी बंद आंदोलन करतील असा इशारा चारही विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी यांच्या विविध संघटनांनी दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









