सावंतवाडी/ प्रतिनिधी-
घारपी- उडाली येथील सातबारावर ऑनलाईनमधील त्रुटी आणि केरळीयन लोकांच्या अतिक्रमणाबाबत सोमवारी येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन सादर केले.
सदर सातबारा नोंदीमध्ये आणेवारी चुकीच्या पद्धतीने झाली आहे तर काही अभिलेखात आणेवारी न दाखवता सामाईक नावांची नोंद करण्यात आली आहे असे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे सादर केले. असा प्रकार घडल्याने त्यावर लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
तसेच घारपी- उडेली येथील काही जमीन केरळीयन नागरिकांनी खरेदी केली असून येथील देवस्थानच्या नावे असलेल्या जमिनीवर सुद्धा अतिक्रमण केले आहे. तसेच अनधिकृतरित्या रस्ते, वीज जोडणीचे खांब उभारले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केला.









