सुमारे अडीच किलोमीटर परिसरात मातीचे लोट : शेतकऱयांसमोर समस्या
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयात जुलै महिन्यात अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापुरामुळे मोठी हानी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच दरम्यान सत्तरी तालुक्मयात डोंगर कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. सुरुवातीला करंझोळ, कुमठळ, झर्मे, माळोली, साटे आदी गावात डोंगर कोसळून मोठय़ा प्रमाणावर माती वाहून येण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. झर्मेत काजूंचे नुकसान झाले असून साटे येथील डोंगर कोसळून मोठय़ा प्रमाणावर माती खाली वाहून आली व सुमारे अडीच किलो मीटर भागात मातीचा थर जमा झाला आहे. साटे गावच्या सीमेतील कर्नाटकाच्या पारवड गावच्या वाटेवर माडाचो खडू लावकेकडे येथून शिधीची कोंड असा भाग साधारण 2.5 ते 3 किलो मीटर लांब, सुमारे 100 मीटर रुंद डोंगराची दरड कोसळली आहे, अशी माहीती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
या प्रकारला मानवच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. मोठय़ा प्रमाणावर होणारी जंगलातील झाडांची कत्तल व त्यामुळे डोंगराच्या उतारीच्या भागातील मातीची होणारी धूप याला प्रमुख कारण आहे. केरी येथील पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, गोवा हा पश्चिम घाटाने व्यापलेला आहे. विशेषतः सत्तरीत डोंगर
रांगा आहेत. या निसर्गरम्य डोंगरावर मोठमोठी झाडे आहेत. सत्तरी पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील आहे. यावषी पुराचा मोठा फटका लोकांना बसलेला आहे. सत्तेवर आलेल्या सरकारने पूरप्रवण क्षेत्रात उपाय योजना हाती घेतलेल्या नाहीत. डोंगरावरील वृक्ष वेलींची लागवड, झाडांचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी कार्यवाही गरजेची आहे. नाहीतर अशा घटना होतच राहणार आहेत. नदीचे चोख व्यवस्थापन झाले पाहिजे. पावसाळय़ात होणारे पूर रोखण्यासाठी निसर्गातील बदल ओळखून पूर्वतयारी करण्याची नितांत गरज आहे. आपत्ती यंत्रणेने सतत सतर्क राहिले पाहिजे. यंत्रणेतील त्रुटी सुधारल्या पाहिजेत. डोंगर कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी डोंगरावरील झाडांचे संरक्षण करणे, पूरप्रवण क्षेत्र अधिसूचित करून संरक्षण देणे, सर्व प्रकारच्या बांधकामांना पूरप्रवण क्षेत्रात प्रतिबंध करणे, शेतीला संरक्षण देणे, वसंत बंधारे पर्यावरण, स्नेही बांधकाम करणे, रेती दगडगोटे उत्खननास प्रतिबंध घालणे, नदीच्या परिसरात वनीकरण करणे, अशा गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे, असे केरकर म्हणाले.
केरीचे पर्यावरणप्रेमी विठ्ठल शेळके म्हणाले, गोमंतकातील सह्याद्रीच्या पर्वत रांगा या वास्तविक गोव्याला लाभलेले नैसर्गिक सुरक्षा कवचच आहे. परंतु आज याच डोंगरांवर अवैध वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे आणि या डोंगरांचे रूपांतर भुस्खलन होताना दिसत आहे. भारतीय मातृवृक्षांची तोड करून त्याठिकाणी काजू बागायती आणि रबर सारख्या झाडांची लागवड केल्याने डोंगर खचले जात आहेत. डोंगरावरील झाडे स्वतःच्या मुळांनी माती घट्ट पकडून ठेवण्याचे काम करतात आणि जेव्हा हेच वृक्ष जमीनदोस्त होतात तेव्हा भूस्खलन होते. लोकांनी स्वतःचा गाव आणि गावचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, अशी वृक्षतोड थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत राजेदं आर्लेकर यांनी व्यक्त केले.