नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पैलवान सागर राणा याच्या हत्येच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाचे निशान होते आणि त्यावर धारदार जड वस्तूने मारा करण्यात आला होता. यामुळे पैलवान सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पैलवान सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निळे निशान होते. डोक्यापासून गुडघ्यापर्यंत जखमा होत्या. शरीरावर ब्लंट ऑब्जेक्टने हल्ला केल्याचे पोस्टमॉर्टममध्ये समोर आले आहे.
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय पैलवान सागर धनखरच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या ऑलिम्पिक पदकविजेता पैलवान सुशील कुमारला दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवलं आहे. सुशीलचा साथीदार अजय यालाही कोर्टाने 6 दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवलं आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला २३ वर्षीय पैलवान सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्याला भारतीय रेल्वे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.