बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आदेशानुसार येथील सागर महाविद्यालयात सर्व प्राध्यापक व प्रशिक्षणार्थींची कोविड तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जी. प्रथमेश, डॉ. बोडीडकर यांनी तपासणी केली. दरम्यान तपासणी केलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शासनाने पदवी व पदक्युत्तर महाविद्यालये सुरू करायला परवानगी दिली आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना चाचणीनंतरच महाविद्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सागर महाविद्यालयात प्राध्यापकांबरोबरच प्रशिक्षणार्थींची कोविड तपासणी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य राजू हळब, प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.









