आंदोलन स्थगित; शरद लाड यांची भेट
देवराष्ट्रे / प्रतिनिधी
सागरेश्वर अभयारण्यातुन वन्यप्राणी बाहेर पडुन शेतपिकांचे मोठे नुकसान करत आहेत. या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करण्यात येणारे शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन दि.27 पर्यत स्थगित करण्यात आले. दि. 27 रोजी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या ऊपस्थितीत बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते शरद लाड, वंचितचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे ऊपस्थित होते.
सागरेश्वरमधील वन्यप्राणी बाहेर पडुन शेतपिकांचे मोठे नुकसान करत आहेत. याबाबत अनेकवेळा मागणी करुनही अभयारण्याचे कुंपन दुरूस्त करण्यात येत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा अभयारण्य प्रशासनास दिला होता.
यानुसार अभयारण्यासमोर शेतकरी जमा होताच वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना निधी नसल्याने कुपन दुरूस्तीचे काम थांबले असुन आदोलन न करण्याची विनंती केली. यावेळी शेतकऱ्यांनी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांना आंदोलन स्थळी बोलावण्याची मागणी केली. परंतु याबाबत वनविभागाने असमर्थता दर्शवली. आंदोलनाची माहीती मिळताच राष्टवादीचे गटनेते शरद लाड आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी चर्चे दरम्यान दि. 27 रोजी वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या ऊपस्थितीत बैठक घेऊन कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे ठरले. यावेळी दिपक शिंदे, प्रकाश ढोकळे, सचिन शिंदे, वैभव होनमाने, पाडुरंग महिंद याच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले, वन्यप्राण्यांमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने शेतकऱ्यांचा प्रश्न समजुन हालचाली कराव्यात. वरिष्ठांनी लक्ष घालावे. प्रस्ताव दिल्यास आमदारफंडातुन कुपनासाठी निधी देऊ. लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा शेतकर्यासोबत आंदोलनात मी स्वता: सहभागी होईन असा इशारा शरद लाड यांनी दिला.