प्रतिनिधी / पलूस
पलूस नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष राजाराम सदामते यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त असलेल्या नगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २६ ऑगस्टला नगरसेवकांमधून पालिकेच्या नूतन नगराध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुमीत जाधव यांनी दिली.
पलूसचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजाराम सदामते यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मागास प्रवर्गासाठी पाच वर्षे राखीव आहे. त्यामुळे आता नगरसेवकांमधूनच नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. सध्या काँग्रेसचे परशुराम शिंदे आणि सुनीता कांबळे या दोन नगरसेवकांपैकी एकास नगराध्यक्ष पदाची संधी मिळू शकते. सध्या जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.








